1994 साली ध्वनी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात पदार्पण करून श्री चंद्रशेखर येलारपुरकर यांनी विविध मनोरंजनाच्या रंगमंचीय कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी लिलया सांभाळली. हे करत असतानाच 1995 मध्ये रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ ची स्थापना करून रेकॉर्डिंग क्षेत्रात पाऊल टाकलं. अत्यंत अल्पावधी मध्येच हे नाव लोकांपर्यंत पोहोचलं. गणेशोत्सवाच्या आणि नवरात्र उत्सवाच्या विविध मंडळाच्या हलत्या आणि जिवंत देखाव्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक याचं काम रिदम रेकॉर्डिंग मध्ये होऊ लागलं. बघता बघता हे नाव अनेक शहरांपर्यंत पोहोचलं आणि तिथूनही रेकॉर्डिंग च्या कामाचा ओघ सुरू झाला.
पुढे 2001 साली व्हिडिओ शूटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग या कामाला सुद्धा सुरुवात झाली. अत्यंत आटोपशीर पद्धतीने मांडणी केलेल्या रीदम रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग ची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. वेगवेगळे गाण्यांचे अल्बम, माहितीपट, विविध भाषेतील चित्रपटांचे एडिटिंग, डबिंग,बॅकग्राऊंड म्युझिक, जाहिराती, झिंगल्स यांना मूर्त रूप देणारा स्टुडिओ म्हणून आता ओळख प्राप्त झाली आहे.आणि त्यातच गणेशोत्सव यामधील देखावा हा अत्यंत सार्वजनिक मंडळाचा जिव्हाळयाचा विषय
2022 साली रिदम आर्ट या संस्थेची लोणी काळभोर या ठिकाणी स्थापना करून गणपती मंडळासाठी विविध फायबर मधील हालत्या देखाव्यांची निर्मिती करून ते गणपती काळात भाड्याने देत आहेत.1994 ते 2026 या कालावधीमध्ये रेकॉर्डिंग क्षेत्रात आणि फायबर मूर्तीचे हलते देखावे या दोन्ही क्षेत्रात भरीव कामगिरी करून चंद्रशेखर
येलारपुरकर आणि त्यांचा रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि रिदम आर्टस् यांनी स्वतःच्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे.